मागण्या पुर्ण न झाल्यास रेल्वे रोको आंदोलन करू ….

2

सावंतवाडी ता.११: फक्त जनशताब्दीला सावंतवाडीत थांबा देवून येथील लोकांची रेल्वेने फसवणूक केली आहे.असा आरोप करीत कोकण रेल्वे संदर्भात प्रवाशी संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास रेल्वे रोको आंदोलन करू,असा इशारा कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष डी.के सावंत यांनी आज येथे दिला.गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना सेवा देण्यासाठी रेल्वे प्रशासन सपशेल अयशस्वी ठरले आहे.त्यामुळे आम्ही त्यांचा निषेध करीत आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी अभिमन्यू लोंढे,नकुल पार्सेकर,भाई देऊलकर,विनोद रेडकर,अशोक देसाई आदी उपस्थित होते.

9

4