अन्यथा.. मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करू

2

सिद्धेश परब: गड किल्ले भाड्याने देण्याचा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी

वेगुर्ले; ता:
गड-किल्ले भाड्याने देण्याच्या संदर्भात शासनाने जो निर्णय घेतला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा 17 सप्टेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा काळे झेंडे दाखवून निषेध करू असा इशारा युवक काँग्रेसच्या वतीने कार्याध्यक्ष सिद्धेश परब यांनी दिला आहे.
याबाबत त्यांनी आज जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे यात असे म्हटले आहे की युती सरकारने गड-किल्ले भाड्याला युती सरकारने गड-किल्ले भाड्याला देण्याचा निर्णय घेतला हा सर्व प्रकार चुकीचा आहे याबाबत योग्य तो अध्यादेश काढून हा निर्णय मागे घेण्यात यावा अन्यथा आम्ही यावर आक्रमक भूमिका घेऊन व जनादेश यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यात दाखल होणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून असा इशारा त्यांनी दिला आहे

1

4