वेंगुर्लेत टेलरिग, फॅशन डिझायनिग व पत्रावळी-द्रोण प्रशिक्षण

215
2
Google search engine
Google search engine

 

वेंगुर्ले : ता.११
वेंगुर्ला नगरपरीषदेच्या महिला बालकल्याण व स्वास्थ समितीच्यावतीने नगरपरीषद हद्दीतील महिला, मुली यांचेसाठी टेलरिग व फॅशन डिझायनिंग तसेच पत्रावळी व द्रोण बनविणे अशी अशी दोन प्रशिक्षणे आयोजित करण्यात येणार आहेत.
ज्या प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणात सहभाग घ्यावयाचा असेल त्यांनी दि. १६ सप्टेंबर पर्यत नगरपरीषद कार्यालयात नावनोंदणी करावयाची आहे. तरी इच्छूक प्रशिक्षणार्थींनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन महिला बालकल्याण व स्वास्थ समितीच्या सभापती अस्मिता राऊळ यांनी केले आहे.