दोडामार्ग,ता.३१: दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम आलेल्या कळणे हायस्कुलची विद्यार्थीनी पालवी लक्ष्मण मेस्त्री हिचा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष एकनाथ नाडकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी चांदीची गणपतीची मुर्ती व गुलाबपुष्प देऊन पालवीचे कौतुक करण्यात आले. यावेळी आडाळी सरपंच पराग गांवकर, कळणे सरपंच अजित देसाई,मोरगाव उपसरपंच देविदास पिरणकर, ग्रामपंचायत सदस्य अमोल परब, गोविंद परब, भिवा गांवकर, कळणे हायस्कुलचे कर्मचारी, मधुकर गांवकर सानिका गांवकर, कल्पना परब, रेश्मा जाधव, राजश्री परब, रामा मेस्त्री आदी उपस्थित होते. पालवी ही आडाळीच्या आशा स्वयंसेविका मिताली मेस्त्री वं ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण मेस्त्री यांची मुलगी आहे. अत्यन्त सामान्य कुटुंबातील पालवीने मिळविलेल्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. तिच्या पुढील शैक्षणिक वाटचालीत लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन श्री. नाडकर्णी यांनी मेस्त्री कुटुंबियांना दिले.
दहावीत यश मिळवणाऱ्या “पालवी”चा एकनाथ नाडकर्णींकडून सन्मान…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES