सावंतवाडी,ता.३१: मनसेचे कोकण पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अभिजीत पानसे उद्या ता १ जून ला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या समवेत नेते शिरीष सावंत, अविनाश जाधव, संदीप दळवी व गजानन राणे आदी उपस्थित राहणार आहेत. सकाळी ११ वाजता कणकवली विधानसभा व कुडाळ विधानसभा मतदार संघाची एकत्रित बैठक हॉटेल हॉर्नबिल बीकेजी रोड सारस्वत बॅंक एटीम समोर बाजारपेठ कणकवली येथे व सावंतवाडी विधानसभा मतदार संघाची बैठक दुपारी ३ वाजता हॉटेल शिल्पग्राम सावंतवाडी येथे आयोजीत करण्यात आलेली आहे. तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, सर्व अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, माजी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांनी वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन अँड. अनिल केसरकर, जिल्हाध्यक्ष धिरज परब आदींनी केले आहे.
मनसेचे पदवीधर मतदार संघाचे उमेदवार अभिजीत पानसे उद्या सिंधुदुर्गात…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES