महसूलला ८ दिवसाचा “अल्टीमेटम”; अन्यथा रस्त्यावर उतरणार…
सावंतवाडी,ता.३१: बांदा व पंचक्रोशीतील नागरिकांची सन २०२१ सालात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीची तात्काळ भरपाई द्या, अन्यथा ८ दिवसानंतर बांदा वासीयांकडून उद्रेक होईल, असा इशारा भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ. श्वेता कोरगावकर यांनी आज महसूल प्रशासनाला दिला. याबाबत सावंतवाडी निवासी नायब तहसीलदार संदीप चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी व्यापारी व सर्वसामान्य नागरिक यांच्या विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी माजी सभापती शितल राऊळ, भाजपा बांदा मंडळ अध्यक्ष महेश धुरी,बांदा सरपंच प्रियांका नाईक,सिद्धेश पावसकर,मधुकर देसाई,बांदा ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, श्रेया केसरकर, रत्नाकर आगलावे, तनुजा वराडकर, अवंतिका पंडित, स्मिता पेडणेकर, गुरु कल्याणकर, स्वागत नाटेकर, गुरु सावंत, सिद्धेश महाजन, सुनील राऊळ, शैलेश केसरकर, प्रवीण देसाई, व्यंकटेश ऊरुमकर आदी उपस्थित होते.