राजू मसुरकरकरांची माहिती; आचारसंहिता असल्यामुळे काही तांत्रिक अडचणी…
सावंतवाडी,ता.३१: येथील कुटीर रुग्णालयात “सिटीस्कॅन मशीन” उपलब्ध झाली आहे. आचारसंहिता संपल्यानंतर ही मशीन रुग्णांच्या सेवेसाठी सुरू करण्यात येईल, असा विश्वास जीवन रक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी व्यक्त केला आहे. ही सिटीस्कॅन मशीन या ठिकाणी बसविण्यासाठी श्री. मसुरकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून प्रयत्न केला होता. त्यानुसार आवश्यक असलेल्या परवानग्या मिळाल्यानंतर सांगली येथील कृष्णा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या वतीने ही सिटीस्कॅन मशीन या ठिकाणी बसविण्यात आली आहे. आचारसंहिता असल्यामुळे ही मशीन अद्याप पर्यंत सुरू करण्यात अडचणी येत आहे. परंतु आचारसंहिता संपल्यानंतर ही मशीन सुरू केली जाईल. अन्य रुग्णांना अत्यंत माफक तर गरीब रुग्णांना मोफत या सुविधेचा लाभ देण्यात येणार आहे. त्यामुळे गरीब लोकांना याचा फायदा होणार आहे, असा विश्वास श्री. मसुरकर यांनी व्यक्त केला आहे.