आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत विजयी संकल्प मेळावा

2

कुडाळ ता 11

शिवसेना नेते युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे शनिवार 14 सप्टेंबर 2019 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन होत आहे. यानिमित्त सकाळी 12 वा.कुडाळ महालक्ष्मी हॉल येथे विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात जन आशीर्वाद यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

विजय संकल्प मेळाव्यात आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार असून यावेळी राज्याचे उद्योग मंत्री ना.सुभाष देसाई, पालकमंत्री ना. दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर आदी उपस्थित राहणार आहेत.तरी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

10

4