साता-यात भीषण अपघात,कर्नाटकातील सहा जण ठार

2

सातारा :ट्रकला बसची मागून धडक बसल्यामुळे बसमधील सहा प्रवासी जागीच ठार झाले.तर वीस जण गंभीर जखमी झाले आहेत.
हा अपघात पहाटे पुणे-बंगळुरु महार्गावरील डी मार्टसमोर घडला. जखमींना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या बसमधील प्रवासी कर्नाटकमधील असल्याचे कळते.
महामार्गावरून कोल्हापूरकडे ट्रक जात होता. यावेळी सातारा शहराजवळच्या खंडेवाडीजवळून जात असताना ट्रकचे टायर फुटले. ट्रकचालकाने ट्रकवर निंयत्रण मिळवत ट्रक जागीच थांबवला. त्याचवेळी एक ट्रॅव्हल्स ट्रकमागून भरधाव वेगाने येत होती. ट्रक रस्त्याच्या मध्येच थांबवल्यामुळे ट्रॅव्हल्स ट्रकला पाठीमागून धडकली. त्यामुळे हा अपघात घडला.

4

4