अनिल सरमळकर यांचा आप मध्ये प्रवेश….

402
2
Google search engine
Google search engine
Google search engine

विवेक ताम्हणकर यांची माहिती; लवकरच मिळणार मोठी जबाबदारी…

कणकवली,ता.०२: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे लेखक नाटककार, परिवर्तन चळवळीतील तरूण विचारक कोकणचे सुपुत्र अनिल सरमळकर यांनी आपच्या राज्यस्तरीय, कोकण प्रांत व जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कणकवली येथे आप मध्ये अधिकृतरित्या प्रवेश केला. लवकरच त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी दिली.

पक्ष प्रवेश कार्यक्रमा वेळी आपचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉ. अभिजीत मोरे, महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटन सचिव डॉ रियाज पठाण, महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटन सचिव संग्राम पाटील, महाराष्ट्र राज्य सहसचिव अविनाश देशमुख, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर, मिली मिश्रा, आदित्य बटावले, मेहबूब मुल्ला, स्वप्नील मीठकर, राजेश माने, प्रमोद जाधव आदि उपस्थित होते.

आपल्या मराठी इंग्रजी लेखनामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेले कोकणचे सुपुत्र अनिल सरमळकर हे गेली दोन दशके मराठी व इंग्रजीमधून सातत्याने कविता दिर्घ कविता कादंबरी नाटक समीक्षा पटकथा इत्यादी क्षेत्रात लेखन करीत असुन ते रंगभूमी व चित्रपट दिग्दर्शक म्हणूनही प्रसिद्ध असुन आपल्या इंग्रजी नाट्य व समीक्षा व वैचारीक लेखनामुळे त्यांना जागतिक पातळीवर ओळख मिळाली आहे.

गेली दोन वर्षे सांगोपांग विचार केल्यानंतर त्यांनी आप पक्षाचे कार्य त्याची ध्येय धोरण पटल्याने तसेच आपचे सर्वेसर्वा संस्थापक व आदर्श नेते अरविंद केजरीवाल यांचा प्रभाव मान्य करुन अनिल सरमळकर यांनी अखेर आप पक्षामध्ये प्रवेश केला आहे. आज आपल्या देशाची लोकशाही व सर्व सामान्य माणसांचे जिवन धोक्यात आले असुन आम आदमी साठी प्रत्यक्ष काम करुन दाखवणारा आप पक्ष मला खराखुरा राजकीय पक्ष वटतो आणि म्हणुनच मी या पक्षामध्ये सामिल होत असुन मी माझ्यापरिने कार्य करुन खारीचा वाटा निश्चित उचलणार आहे असे अनिल सरमळकर यांनी पक्ष प्रवेश केल्यानंतर स्पष्ट केले.

देशाचे सार्वभौमत्व जसे धोक्यात आहे तसेच देशाच्या सर्व सामान्य दलित आदिवासी अल्पसंख्य समाजांचे समुहांचे जगणे धोक्यात आले आहे. प्रस्थापित राजकीय शक्ती सामान्य भारतीय जनतेचे ना ना तऱ्हेने शोषण करीत असुन त्यांना जगणे असह्य करुन सोडत आहे अशा अत्यंत आव्हानात्मक काळात आदरणीय अरविंदभाई केजरीवाल आम आदमी पक्षाच्या मार्गाने देशातील सामान्य जनतेला धीर देत आहे ही एक दिलासादायक घटना आहे म्हणूनच मी आजवर कधीही कोणत्याही राजकीय पक्षात सहभागी झालो नव्हतो परंतु आम आदमी पक्ष हे एक सामान्य जनतेचे लढण्याचे व जगण्याचे व्यासपीठ आहे असे मला वाटते म्हणुन याच कारणाने प्रभावित होवून मी आप मध्ये प्रवेश केला आहे असे सांगुन पुढे अनिल सरमळकर म्हणाले की ‘ मी लेखक आहे माझे लेखक असणे आणि माझी अभिव्यक्ती हे स्वतंत्र राहणार आहेत. कोकणातील तरुण तरुणींनी आम आदमी पक्षात सहभागी व्हावे असे आवाहन अनिल सरमळकर यानी केले आहे.

\