वेंगुर्ले हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न…

417
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा,ता.०२: वेंगुर्ले हायस्कूल वेंगुर्ला एस.एस.सी. ग्रुप १९९२-९३ च्या माजी विद्यार्था- विद्यार्थिनींचा तिसरा स्नेहमेळावा नुकताच आदर्श पर्यटन केंद्र वेंगुर्ला कॅम्प येथे उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याला उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन कार्यक्रम, मनोगते सादर करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी शाळेचे माजी मुख्याध्यापक एस. एस. काळे यांनी या मेळाव्याला उपस्थिती दर्शविली. माजी विद्यार्थ्यी बाळा आरांवदेकर यांच्या हस्ते सरांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. मजेशीर खेळ व गाणी व इतर कार्यक्रमांनी हा स्नेहमेळावा यादगार ठरला. आदर्श पर्यटन केंद्र वेंगुर्ला कॅम्प या रमणीय व निसर्गरम्य पर्यटनस्थळी या मेळाव्याचे आयोजन केले होते. पुन्हा एकदा तब्बल ३१ वर्षांनंतर एकत्र आलेल्या वर्गमित्रांच्या संवादाने संबंध अधिकच दृढ झाले. आपापल्या आयुष्यातील व करिअरमधील चढ-उतारांचे अनुभव कथन करीत सर्वानी मने मोकळी केली.

दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी- व्यवसायानिमित्त एकमेकांपासून दूर गेलेले हे विद्यार्थीं-विद्यार्थिनी पुन्हा एकदा तब्बल ३१ वर्षानंतर स्नेहमेळाव्यात एकत्र आले होते. वेंगुल्यातील स्थायिक व आता नोकरी निमित्ताने पुणे, मुंबई, गोवा, कतार, मध्यप्रदेशमध्ये, अमेरीका अशा देश व विदेशात असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सहभाग असलेला हा स्नेहमेळावा पुन्हा एकदा तिसऱ्या वर्षी यादगार ठरला. नियोजनबद्ध कार्यक्रमामुळे मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बाळा आरांवदेकर, राकेश परब, सुधीर गावडे, विनोद परब, आनंद परब अनंत परब, हेमंत चव्हाण, यशवंत उर्फ बली नाईक, केदार आंगचेकर, प्रसाद मराठे, नामदेव सरमळकर, सुमन परब, मनिषा पालव, शोभना जोशी, प्रतिभा परब, दिपक परब,मनिषा रेडकर, प्रभाकर देऊलकर,ललिता फाटक, साधना फाटक, जॉयसी कार्डोज, संजू फर्नांडिस, राजन कांबळी, महेंद्र जाधव, जयेंद्र गावडे, दिंगबर आरोलकर, उल्हास मुळीक, सुनील मुळीक, सारीका पाटील, सुहासिनी सावंत, निलेश बांदेकर, नरेंद्र नाईक, हेमंत चव्हाण, घन:शाम केरकर, रोहन रणभिसे, हरिश्चंद्र कोचरेकर, प्रशांत दिपनाईक, गुरूनाथ तांडेल, गंगाराम परब, अर्जून कासवकर, प्रसाद मराठे, संतोष परब, संतोष गोरे, निलेश गंगावणे, अशोक आरोलकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुमन परब हीने तर आभार राकेश परब यांनी मानले.

\