दीपक केसरकर:नितेश राणेंसह राजन तेंली यांचे नाव न घेता टीका
सावंतवाडी.ता,१२: साळगावकरांचा बोलविता धनी कोण हे आता आमदार नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर कळले.ही सर्व गोवा भेटीची कमाल असा टोला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे लगावला.जादू करणी अशा अंधश्रद्धेच्या गोष्टी विसरल्या पाहीजेत आधुनिक काळात या शोभून दिसत नाहीत असाही सल्ला यावेळी त्यांनी दिला .
श्री केसरकर यांच्या विरोधात आमदार नितेश राणे यांनी काल वक्तव्य केले होते यात केसरकर यांचे अत्यंत जवळचे असलेले साळगावकरांना केसरकर यांनी आरोप केले नाही तल वास्तव मांडले अशी टीका केली होती. अत्यंत जवळचे असलेले किंवा राजकीय वारसदार म्हणून केसरकरांनी जाहीर केलेले बबन साळगावकर त्यांना सोडून का गेली याचे आत्मचिंतन करावे असाही त्यांनी टीका केली होती.
याबाबत आज श्री केसरकरांना छेडले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली ते म्हणाले साळगावकर यांच्या तोंडून नेमके कोण बोलले याचा आता प्रत्यय आला. अशा गोष्टीवर आपल्याला उत्तर द्यावेसे वाटत नाही.आपण विज्ञानाच्या शतकात जगत आहोत त्यामुळे अंधश्रद्धा जादू करणे अशा गोष्टीवर विश्वास ठेवणे योग्य नाही
ते पुढे म्हणाले आपण कोट्यवधीचा निधी आणला मात्र काही लोक आपले बॅनर करून त्या ठिकाणी क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करत आहेत असे माजी आमदार राजन तेली यांचे नाव न घेता त्यांनी टीका केली आपण फक्त काम करतो श्री मात्र काही लोक श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असतात असे त्यांनी यावेळी सांगितले जिल्ह्यातील विकास कामासाठी ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे याबाबत सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन नियोजन करण्यात आले असे त्यांनी यावेळी सांगितले.