गजानन नाईक यांचा १५ रोजी सत्कार..

2

सावंतवाडी.ता,१२: सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष गजानन नाईक यांची अखिल मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल १५ सप्टेंबरला सकाळी अकरा वाजता राणी पार्वतीदेवी हायस्कूल च्या नवरंग सभागृहात गौरव समारंभाचे आयोजन जिल्हा पत्रकार संघ सावंतवाडी लायन्स क्लब नाईक परिवार यांच्या तर्फे केले आहे.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पालकमंत्री दीपक केसरकर, मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, नगराध्यक्ष बबन साळगावकर, सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे विकास सावंत,भोसले नॉलेज सिटीचे अच्युत सावंत- भोसले,तहसीलदार राजाराम म्हात्रे, उपस्थित राहणार आहेत. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे लायसन्स चे अध्यक्ष रविकांत सावंत यांनी केले आहे.

9

4