वेंगुर्ल्यात गणरायांना भावपूर्ण वातावरणात निरोप

488
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले,ता.१२:गणपती बाप्पा मोरया…असा जयघोष करीत आणि पुढच्या वर्षी लवकर या…अशी विनंती करत आज ११ व्या दिवशी अनंत चतुर्थीचे अवचित्त्य साधून वेंगुर्ले तालुक्यातील अनेक गणपतींचे वाजत गाजत विसर्जन करण्यात आले.

गेले अकरा दिवस प्रत्येकाने बाप्पाचे विधिवत पूजन करून हा गणेशोत्सव साजरा केला. या वर्षी पावसाने सर्वांच्या आनंदावर पाणी पाडल मात्र तरीही सर्वांनी उत्साहात हा उत्सव साजरा केला. काहींनी दीड दिवसांनी, काहींनी पाच, सात व नऊ दिवसांनी आपल्या बाप्पाचे विसर्जन केले. मात्र राहिलेल्या गणपतींचे आज विसर्जन करण्यात आले. ढोल ताशा वाजवत, तसेच गुलाल उडवत आणि फटाक्यांची आतषबाजी करीत डीजेच्या तालावर विसर्जन मिरवणुका निघाल्या. नदीवर, ओहोळत आणि समुद्रात हे विसर्जन करण्यात आले.
*वेंगुर्ले च्या राजाच्या मिरवणुकीला प्रारंभ*
वेंगुर्लेतील गाडीअड्डा येथे प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सवातील वेंगुर्ले च्या राजाची विसर्जन मिरवणूक सायंकाळी सुरू झाली. डीजेच्या तालावर बाजारपेठेतून ही मिरवणूक निघाली असून रात्री उशिरा मांडवी खाडीमध्ये गणरायांचे विसर्जन होणार आहे.

\