सावंतवाडीत चर्चा “जादु”च्या फलकाची…

1670
2
Google search engine
Google search engine

नाक्या-नाक्यावर असलेले फलक मात्र सकाळी अचानक गायब…

सावंतवाडी/अमोल टेंबकर,ता.१३ पालकमंत्री दीपक केसरकर आणि नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्यात जादूवरून कलगीतुरा रंगलेला असतानाच आज सावंतवाडी शहरात “दीपक समृद्धीचा” जादू धडाडीची,आत्मीयतेची,साई भक्तीची अशा आशयाचे फलक लावण्यात आले होते.काही वेळाने मात्र हे फलक काढुन टाकण्यात आले मात्र नेमके हे फलक कोणी लावले होते. व कोणी काढले हे मात्र शेवटपर्यंत कळू शकले नाही.मात्र या प्रकाराची चर्चा जोरदार सुरू आहे.
दीपक केसरकर प्रेमी सावंतवाडीकर असा यावर उल्लेख होता.परंतु काही वेळातच हे फलक काढण्यात आले.त्यामुळे हे फलक गायब करण्याची जादू कोणाकडून झाली.ही चर्चा शहरात सुरू होती.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात निवडणूकच्या पार्श्वभूमीवर वातावरण ढवळून निघाले आहे.यात केसरकर आणि साळगावकर यांच्यात जादूवर कलगीतुरा रंगला आहे.जादूगार आणि अॅक्टर आहेत.असा आरोप साळगावकर यांनी केला होता.याला प्रत्युत्तर देताना पालकमंत्री केसरकर यांनी आपल्याकडे प्रेमाची जादू आहे.मी प्रेमाने जग जिंकले असे सांगून त्यांना प्रत्युत्तर दिले होते.या पार्श्वभूमीवर एकेकाळच्या या दोघा मित्रात जादू वरून असलेली लढाई जोरदार रंगलेली आहे. ही घटना ताजी असतानाच आज सकाळी शहरातील विविध नाक्यावर दीपक समृद्धीचा जादू प्रेमाची सावंतवाडी करांवर अशीच राहुदे.श्री देव उपरलकर द्वेषाची काळी जादू उलटून टाकू दे असे फलक लावण्यात आले होते त्यामुळे हा चर्चेचा विषय बनला होता मात्र काही वेळातच हे फलक काढून टाकण्यात आले