बांदा भाजपच्या वतीने रस्त्याची श्रमदानातून साफसफाई….

111
2
Google search engine
Google search engine
Google search engine

बांदा,ता.०६: शहरातील भाजपा कार्यकर्त्यांनी एकत्र येत बांदा मच्छी मार्केट-पाटो पूल ते मुंबई गोवा महामार्ग पर्यंतच्या जोड रस्त्याची आज श्रमदान करत साफसफाई केली. या रस्त्यावर पूर्णपणे झाडेझुडपे वाढल्यामुळे रहदारीला त्रास होत होता. यावेळी रस्त्यावरील वाढलेली पूर्ण झाडेझुडपे साफ करण्यात आली.
तसेच रस्त्याची देखील साफसफाई करण्यात आली. शैलेश केसरकर यांनी सांगितले की, येथून ये-जा करणाऱ्या असंख्य नागरिकांना याचा त्रास होत होता व याबाबत तक्रारी येत होत्या, त्यामुळे आम्ही एकत्र येत नागरिकांना होणारा त्रास ओळखून आज श्रमदानाने साफसफाई करण्याचा निर्णय घेतला. यावेळी गुरु कल्याणकर यांनी सांगितले की, सदर रस्ता हा निमजगा, गडगेवाडी, गवळीटेंब येथील नागरिकांना बाजारपेठेत, मच्छी मार्केटमध्ये व इतर कामाकरता येण्यासाठी अतिशय महत्त्वाचा व सोईस्कर असा रस्ता असून पावसात कायम या रस्त्यावर खड्डे व चिखलामुळे येथील नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यासाठी सदर रस्ता लवकरात लवकर कॉंक्रिटीकरण करून घेण्यासाठी प्रयत्न करणार. रस्त्याची साफसफाई करण्यात आल्याने येथून प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांनी याबाबत समाधान व्यक्त केले.
यावेळी बांदा भाजपा शक्ती केंद्रप्रमुख मनोज कल्याणकर, भाजपा बांदा शहर युवा मोर्चा अध्यक्ष साई सावंत, गुरु कल्याणकर व शैलेश केसरकर आदी उपस्थित होते.

\