मठ येथील अपुर्ण पुलासह गणेश घाटाचे काम तात्काळ पुर्ण करा…

91
2
Google search engine
Google search engine
Google search engine

भाजपा युवा मोर्चा पदाधिकार्‍यांची मागणी; ८ दिवसात काम सुरू न झाल्यास आंदोलन…

वेंगुर्ले,ता.०६: मठ-बोवलेकरवाडी येथील अपुर्ण असलेल्या पुलाचे काम तसेच परिसरात असलेल्या गणेश घाटाचे काम येत्या ८ दिवसात पुर्ण करा, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा भाजपा युवा मोर्च्याच्या माध्यमातून आज बांधकाम विभागाला देण्यात आला आहे. या ठिकाणी पुलाचे काम अपुर्ण असल्यामुळे तेथील जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच हे काम अर्धवट असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याबाबत तात्काळ योग्य ती भूमिका घेण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून आज याबाबत बांधकाम विभाग अधिकार्‍यांचे लक्ष वेधण्यात आले यावेळी मठ उपसरपंच महादेव गावडे, युवा पदाधिकारी समीर नाईक, प्रशांत बोवलेकर, विराज बोवलेकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष भूषण आंगचेकर, हेमंत गावडे, हितेश धुरी उपस्थित होते.

\