प्रशांत कोठावळे यांचा ५० वा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा…

2

सावंतवाडी ता.१३: ला.प्रशांत कोठावळे यांच्या पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त आज लायन-लायनेस क्लब,सावंतवाडी व युवा सिंधू फाउंडेशन,सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील कुटीर रुग्णालयात रक्तदान व मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.
श्री.कोठावळे यांचा पन्नासावा वाढदिवस आज त्यांच्या कुटुंबीय व मित्र परिवाराकडून समाजोपयोगी उपक्रम राबवून साजरा करण्यात आला.यावेळी रुग्णांना कान-नाक-घसा,स्त्री-रोग,वंध्यत्व,अस्थीरोग,मधुमेह आदी आजारावर मोफत औषधोपचार देण्यात आले.ही तपासणी डॉ.चेतन घोरपडे,डॉ.पूजा घोरपडे,डॉ.अमित बुरांडे,डॉ.मिता बुरांडे आदी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने पार पाडण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा,नगरसेविका शुभांगी सुकी,रुपेश राऊळ,रविकांत सावंत,बाळा बोर्डेकर,अपर्णा कोथळे,नीता कविटकर,शब्बीर मणियार,सागर नाणोसकर,अशोक दळवी,गजानन नाटेकर,अमिता मसुरकर,वैभवी नेवगी,चंद्रकांत कासार, आबा केरकर,रश्मी माळवदे,गुणाजी गावडे,योगेश नाईक,प्रणिता कोटकर,मुन्ना आजगावकर,सोनू गवस,ओंकार सावंत,हेलन निबरे,अदिती कोठावळे,मिहिरा कोठावळे आदी उपस्थित होते.

40

4