नेमळे येथे कारच्या धडकेत शिक्षक जखमी…

481
2
Google search engine
Google search engine
Google search engine

अपघातानंतर कार चालकाचे पलायन; अधिक उपचारासाठी बांबुळीत हलविले…

सावंतवाडी,ता.०६: अज्ञात कारने धडक दिल्यामुळे बांदा जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रंगनाथ परब हे जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी साडे बारा वाजता झाराप-पत्रादेवी महामार्गावर नेमळे येथे घडली. त्यांना उपचारासाठी सावंतवाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांच्या मेंदूला दुखापत झाल्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद नसल्याचे सांगण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की, नेमळे-फौजदारवाडी येथे राहणारे श्री. परब महामार्गाच्या बाजूने जात होते. यावेळी त्यांना अज्ञात गाडीने धडक दिली. त्यामुळे ते त्या ठिकाणी बेशुध्द पडले. यावेळी अपघात झाल्याचे लक्षात येताच कार चालकाने पळ काढला. हा प्रकार तेथे असलेल्या काही स्थानिक ग्रामस्थांनी पाहिला. यावेळी त्यांनी तात्काळ परब यांना घेवून सावंतवाडी कुटीर रुग्णालय गाठले. परंतू त्यांच्या मेंदुला दुखापत झाल्यामुळे त्यांना अधिक उपचारासाठी गोवा-बांबुळी येथे हलविण्यात आले आहे. याबाबत सावंतवाडी पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद नाही.

\