बबन साळगावकर; राणेंना भेटण्यात गैर काय?,कोणाला भेटावे,हा माझा वैयक्तिक प्रश्न….

390
2
Google search engine
Google search engine

बबन साळगावकर; राणेंना भेटण्यात गैर काय?,कोणाला भेटावे,हा माझा वैयक्तिक प्रश्न….

सावंतवाडी ता.१३: महाराष्ट्राचा गृहराज्यमंत्री व्यासपीठावर रडतात हे राज्याच्या राजकारणाला भूषणावह नाही,मी कोणाला भेटावे हे सांगण्याची पालकमंत्री दीपक केसरकर यांना गरज नाही,त्यांच्या राजकारणाची सुरुवात दगा-फटक्यातून झाली आहे.त्यामुळे अशा राजकारणाचा वारसदार मी होऊ इच्छित नाही.राहिला प्रश्न नगराध्यक्षपदाचा ते मला लोकांनी दिलेले आहे त्यामुळे सावंतवाडी शहराच्या विकासात खो पडत असेल,तर ते पण मी कधीही सोडण्यासाठी तयार आहे.अशी भूमिका नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना मांडली.
श्री साळगावकर पुढे म्हणाले,केसरकरां पूर्वी दहा वर्षे अगोदर राजकारणात मी आलो आहे.त्यामुळे राजकारण्यांच्या गोष्टी मला त्यांनी शिकवू नये,मला लोकांचा जनाधार आहे.त्यामुळे काही झाले तरी मी येणाऱ्या निवडणुकीत निश्चितच निवडून येईल,असा दावा श्री.साळगावकर यांनी केला.आपण आज राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्याकडे विधानसभा निवडणूक लढविण्यासंदर्भात इच्छा व्यक्त केली आहे.असेही त्यांनी यावेळी सांगितले.