वैभववाडीत जिल्हा बँकेच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

100
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वैभववाडी,ता.०७: सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून तालुक्यातील दहावी व बारावीच्या परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे यांनी सर्व विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी दहावीच्या परीक्षेत तालुक्यात प्रथम आलेला श्रेया शेळके, द्वितीय मानसी चव्हाण, तृतीय प्रीती रावराणे व बारावी मध्ये प्रथम आलेली निरजा मांजरेकर, द्वितीय प्रफुल मोरे, तृतीय शुभम परब आदी गुणवंत विद्यार्थ्यांचा बँकेच्या वतीने भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक संदिप शेळके, श्रेया शेळके, व धनंजय पडवळ यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वैभववाडी शाखा व्यवस्थापक प्रभाकर गायकवाड, विकास अधिकारी प्रल्हाद कुडतरकर, भुईबावडा शाखा व्यवस्थापक धनंजय पडवळ, सहाय्यक शाखा व्यवस्थापक सुरेश रावराणे, कर्मचारी जयेश सावंत, व्ही. आर. चांदोडे, राहुल कदम, अस्मिता रावराणे, अमीन जेट्टी, सुरेश शेळके, अजित हुंबे, सचिन रावराणे, अनंत पवार व कर्मचारी उपस्थित होते.

\