सावंतवाडी विधानसभा लढविण्यास बबन साळगावकर इच्छुक

273
2
Google search engine
Google search engine

अमित सामंत:त्यांच्याकडे असलेल्या “डायरी”ची प्रसंगी आम्ही मदत घेवू

सावंतवाडी ता.१३: नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी आपल्याकडे राष्ट्रवादीतून विधानसभेची उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे.हा निर्णय पक्षाचा असला तरी आम्ही त्यांच्या पाठीशी कायम उभे राहणार आहोत,असा विश्वास राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी आज येथे व्यक्त केला.आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर आमचा मुख्य लक्ष्य आहे.आवश्यकता भासल्यास सावंतवाडी मतदार संघात साळगावकरांकडे असलेल्या डायरीचा उपयोग करून घेऊ,,असाही टोला त्यांनी लगावला.
श्री.सामंत यांनी आज या ठिकाणी येऊन नगराध्यक्ष साळगावकर यांची भेट घेतली.त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी भास्कर परब,जिल्हा युवा अध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक,जिल्हा बँक संचालक आत्माराम ओटवणेकर,सत्यजित धारणकर,अभय पंडीत आदी उपस्थित होते.
यावेळी श्री.सामंत म्हणाले आपल्याकडे जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.येणाऱ्या काळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.त्यादृष्टीने आज दोडामार्ग पासून आपण दौऱ्याला सुरुवात केली.सावंतवाडी नगराध्यक्षांची भेट घेतल्यानंतर आपण विधानसभा लढविण्यास इच्छुक आहे,असे त्यांनी सांगितले.त्यामुळे त्यांच्या या इच्छे बाबत आपण वरिष्ठांशी चर्चा करणार आहे.आपला लढा हा प्रवृत्तीशी आहे.त्यामुळे त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहणार आहोत.आता एकटे नाहीत प्रसंगी त्यांच्यासाठी रस्त्यावर उतरण्याची सुद्धा आमची तयारी आहे.येणाऱ्या काळात कोणता निर्णय घ्यावा हे लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. सौ अर्चना घारे यांच्यासह एम के गावडे आधी पदाधिकारी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.मात्र त्यांच्याकडे पक्ष निरीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे.त्यांनी कुठेही आपण निवडणूक लढवू असे सांगितले नाही.त्यामुळे नेमका उमेदवार कोण असेल याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला जाईल.राष्ट्रवादीकडे सर्व पर्याय खुले आहेत.महाराष्ट्र स्वाभिमानची मदत घ्यावी याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही,आवश्यक वाटल्यास त्यावर सकारात्मक विचार करू असेही श्री.सामंत यांनी यावेळी सांगितले.