Thursday, June 19, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याबांदा बस स्थानकातील समस्यांबाबत ठाकरे शिवसेना आक्रमक...

बांदा बस स्थानकातील समस्यांबाबत ठाकरे शिवसेना आक्रमक…

आगारप्रमुखांचे वेधले लक्ष; ८ दिवसात प्रश्न सोडवण्याची मागणी…

बांदा,ता.०८: येथील बस स्थानकात असलेल्या विविध समस्यांबाबत ठाकरे गटाच्या अल्पसंख्यांक सेल कडून आज लक्ष वेधण्यात आले. ग्राहकांना व विशेषतः विद्यार्थ्यांना चांगली सेवा मिळावी यासाठी लवकरात लवकर निर्णय घेऊन योग्य ते नियोजन करण्यात यावे, अशी मागणी अल्पसंख्यांक गटाचे उपाध्यक्ष रियाज खान यांनी केली आहे. याबाबत सावंतवाडीचे आगार व्यवस्थापक श्री. शेवाळे यांना त्यांनी निवेदन दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे कि, दोडामार्ग, सावंतवाडी आणि गोव्याकरिता बांदा बस स्थानक हे मध्यवर्ती ठिकाण असून येथून पुणे, मुंबई, गोवा, लातूर अशा अनेक बसेस मार्गस्थ होतात. मात्र हे मध्यवर्ती ठिकाण असूनही प्रवासी वर्दळ जास्त असूनही सदर बस स्थानकावर बस आरक्षण (बुकिंग) करण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे मुंबई, लातूर, पुणे, कोल्हापूर जाण्याकरिता बस आरक्षण करण्याकरिता मुद्दामहून खर्च करून वेळेचा अपव्यय करून सावंतवाडी बस स्थानक गाठावे लागते. त्यामुळे याठिकाणी आरक्षण सुविधा उपलब्ध करावी.

सध्या बांदा बस स्थानाकात दोन वाहतूक नियंत्रकांची नेमणूक आहे. शाळा सुरु होणार आहेत अशा वेळी विध्यार्थाना दोन्ही सत्रात पास वितरित केले जावेत. पास नाकारू नयेत. तसेच बांदा बस स्थानकावर गाड्यांची वेळ अनाउंस करण्याकरिता साऊंड सिस्टीम उपलब्ध नाही. अशा अनेक समस्या बांदा बस स्थानका ला भेडसावत आहेत. तरी याकडे एसटीच्या वरिष्ठ अधीकाऱ्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे.

महामंडळाने बस स्थानक स्वच्छता आणी इतर बाबी करिता बाळासाहेब ठाकरे स्वच्छता अभियान राबविले होते. त्यात या गोष्टी अंतर्भुत होत्या, मात्र त्याकडेही दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे. तरी त्वरित बस आरक्षणाकरिता बुकिंग सुविधा आणी अनाउंस सिस्टीम त्वरित सुरु करावी, जेणेकरून प्रवाशांना याचा फायदा होईल.यावेळी राजा खान, गिरीश नाटेकर, साहिल खोबरेकर, श्रीकांत धोत्रे, सागर धोत्रे, राहुल माने, रफिक शेख, न्हानू शेर्लेकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments