Thursday, June 19, 2025
Google search engine
Homeआंतरराष्ट्रीयसंरक्षक भिंत कोसळून पर्यटकांच्या कारचे नुकसान... 

संरक्षक भिंत कोसळून पर्यटकांच्या कारचे नुकसान… 

आंबोली येथील घटना; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही…

आंबोली,ता.०८: येथील राघवेश्वर मठ परिसरात बांधकामाची संरक्षक भिंत कोसळल्याने शिरूर येथील एका भाविकाच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही. ही घटना रात्री ९ वाजता घडली. दर शनिवारी प.पू.भारतदास महाराजांच्या मठात धार्मिक कार्यक्रम व पूजा असते. त्यासाठी मोठ्या संख्येने भाविक त्या ठिकाणी येतात असतात. आज झालेल्या मुसळधार पावसात ही भिंत कोसळली. त्या ठिकाणी राम मंदिर जीर्णोद्धार आणि सभामंडपाचे काम सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments