माझ्यावर टीका केल्यास साळगावकरांचीच प्रतिमा मलिन होईल…

2

दीपक केसरकर; माझ्यावर टीका करण्याची जबाबदारी कोणी तरी त्यांना दिली असल्याचा संशय..

सावंतवाडी ता.१३: माझ्यावर टीका करण्याची जबाबदारी नगराध्यक्ष बबन साळगावकरांवर कोणीतरी सोपवली असेल.त्याचे ते पालन करीत आहेत.मात्र मी त्यांच्यावर टीका करणार नाही,आणि ते असेच टीका करीत राहीले तर त्यांचीच प्रतिमा मलिन होईल,असा प्रतिटोला पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे लगावला.
सावंतवाडीच्या विकासात ते “खो” घालणार नाहीत हे ऐकून आनंद झाला.आता त्यांनी सावंतवाडीतील रखडलेली दहा कोटी रुपयांची अंडरग्राउंड वीज वाहिन्यांची स्कीम सुरू करून आपली जबाबदारी दाखवून द्यावी.नगराध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याबाबतचा निर्णय त्यांचा त्यांनी घ्यावा,असेही श्री.केसरकर यांनी सांगितले.
श्री.केसरकर यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली.मुळात साळगावकर यांना माझ्यावर टीका करण्याची जबाबदारी कोणीतरी दिलेली असावी.त्याचे ते पालन करीत आहेत,अशी मला दाट शक्यता आहे.मात्र ते कोणत्याही थराला जाऊन बोलले तरी मी त्यांच्याविरोधात बोलणार नाही,

9

4