कट्टा येथे मराठा समाजाच्या माध्यमातून १६ जूनला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…

43
2
Google search engine
Google search engine
Google search engine

ओरोस,ता.११: मालवण-कट्टा दशक्रोशीतील सकल मराठा समाजाच्या वतीने दहावी व बारावी परीक्षांमध्ये उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ १६ जूनला दुपारी ३ वाजता वराड-हडपीवाडी येथील नम्रता मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सकल मराठा समाजाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲड. सुहास सावंत, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक बाबा परब, मालवण तालुका मराठा उत्कर्ष मंडळ उपाध्यक्ष विनायक परब तसेच मुंबई येथील उद्योजक सुभाष काराणे, उद्योजक देवेन ढोलम आदी उपस्थित राहणार आहेत. दरम्यान यावेळी उपस्थित राहून सत्कार स्वीकारण्याचे आवाहन मराठा समाजाच्या वतीने विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.

\