चौकुळ येथे पुकारण्यात आलेले आंदोलन अखेर दीपक केसरकरांच्या मध्यस्थीनंतर मागे…

491
2
Google search engine
Google search engine
Google search engine

आंबोली,ता.११: चौकुळ येथे ग्रामस्थांच्या माध्यमातून महावितरण व बीएसएनएलच्या विरोधात पुकारण्यात आलेले ठिय्या आंदोलन अखेर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले आहे. गावामध्ये वारंवार होणाऱ्या विजेच्या आणि मोबाईल रेंजच्या समस्येवर ग्रामस्थांनी मिळून येथील नंदू गावडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडले होते. जवळपास ७० युवकांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.
दरम्यान जोपर्यंत बीएसएनएल नेटवर्कच्या व विजेच्या समस्या सुटत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा सरपंच बाबू शेटवे यांना देण्यात आला होता. यावेळी सामाजिक कार्यकर्ते दिनेश गावडे यांनी आंदोलनाला भेट देत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर बीएसएनएल व महावितरणाच्या अधिकाऱ्यांशी श्री. केसरकर यांनी फोनवरून चर्चा केली. त्यानुसार बीएसएनएलचे प्रबंधक रविकिरण व वीज वितरणाचे कनिष्ट अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांनी चौकुळ येथील आंदोलकांना भेट देऊन चर्चा करू, असे आश्वासन दिले. त्यानुसार हे आंदोलन घेण्यात आले आहे. यावेळी तुकाराम गावडे, अविल गावडे, शशी शेटवे, रतन गावडे, अजित गावडे, नितीन गावडे आदी उपस्थित होते

\