सावंतवाडीत २२ ते २४ ला मोफत योग जागरण शिबिराचे आयोजन…  

120
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सावंतवाडी, ता.११: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सावंतवाडीत तीन दिवशीय विनाशुल्क योग जागरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर २२ ते २४ या काळात येथील वैश्य भवन मध्ये सायंकाळी ६ ते ८ या काळात होणार आहे. सावंतवाडी पतंजली योग समिती, सावंतवाडी वैश्य समाज व सावंतवाडी तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे.

या शिबिरास योगशिक्षक विकास गोवेकर दत्तात्रय निखार्गे व विद्याधर पाटणकर हे मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरात आरोग्य संवर्धनासाठी नित्यनियमाने कोणता योगाभ्यास करावा यासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे.

या शिबिराचे उद्घाटन २२ जून ला सायंकाळी ५:३० वाजता होणार आहे. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांच्या हस्ते केले जाणार असून या कार्यक्रमास डिजिटल मीडियाचे जिल्हाप्रमुख अमोल टेंबकर, ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंढे, माजी राज्य अध्यक्ष गजानन नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या शिबिरामध्ये रामनाथ सामंत, दत्तात्रय सडेकर, मीना सामंत, तानाजी वरक, रामजी परब व शरद कालेलकर हेही मार्गदर्शन करणार आहेत. या शिबिरात आरोग्य संवर्धनासाठी नित्यनेमाने कोणता योगाभ्यास करावा यासंबंधी मार्गदर्शन केले जाणार आहे. साधकाने शिबिरात येताना सैल कपडे परिधान करून यावे तसेच सोबत स्वतःला बसण्यासाठी जाजम आणावे

तरी या शिबिरात महिला व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, असे आवाहन पतंजली योग समितीचे महेश भाट, वैश्य समाज सावंतवाडी चे अध्यक्ष रमेश बोंद्रे आणि सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार यांनी केले आहे.

\