दोडामार्ग,ता.११: आडाळी-फोडिये ग्रुप ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी विशाखा विठोबा गांवकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. परेश सावंत यांनी राजीनामा दिल्यानंतर आडाळी ग्रामपंचायतचे उपसरपंचपद रिक्त होते. त्याची निवडणूक प्रक्रिया सरपंच पराग गांवकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सौ. गांवकर यांचा एकच अर्ज आला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. यावेळी श्री. गांवकर यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी माजी उपसरपंच परेश सावंत, ग्रामपंचायत सदस्य निशा गांवकर, संजना गांवकर, अमोल परब, विठोबा गांवकर, ग्रामसेवक कुणाल मसगे उपस्थित होते.
आडाळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विशाखा गांवकर बिनविरोध…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES