Monday, April 28, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यादोडामार्गमधील कुडासे गावाचे विभाजन

दोडामार्गमधील कुडासे गावाचे विभाजन

नवीन वानोशी महसुली गावाची    निर्मिती प्रारूप अधिसूचना प्रसिद्ध

सिंधुदुर्गनगरी.ता,१३:दोडामार्ग तालुक्यातील मौजे कुडासे या गावाचे दोन महसूली गावात रुपांतर करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी मान्यता दिली आहे. या गावातून तिलारी नदी वाहत असल्याने गावाचे नैसर्गिक रित्या दोन भाग पडतात. नदीच्या दक्षिणेस असलेल्या वाणोशीवाडी, धनगरपाटी व देवमळावाडी या वाड्यांचे मिळून वानोशी असे नवीन महसूल गाव तयार निर्माण करण्यात येत आहे. तर मुळच्या मौजे कुडासे गावामध्ये भरपालवाडी, राऊळवाडी, गावठाणवाडी व हरिजनवाडी या वाड्यांचा समावेश असणार आहे. याविषयीची प्रारूप अधिसूचना ग्रामपंचायत, मंडळ अधिकारी, तलाठी सजा येथील नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. नागरिकांच्या काही हरतकी व सूचना असल्यास त्या दिनांक 7 ऑक्टोबर 2019 पूर्वी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे कराव्यात असे निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी कलविले आहे.पूर्वीच्या कुडासे गावात सर्व्हे नं 1 ते 132 व् 417 ते 420 तर नव्याने निर्मिती करण्यात येत असलेल्या वानोशी गावात सर्व्हे नं 133 ते 416 असे भूमापन करण्यात आले आहे. नव्याने निर्मित करण्यात आलेल्या वानोशी गावातील वानोशीवाडी, धनगरवाडी व देवमळावाडी येथील नागरीकांना ग्राम पंचायत कार्यालय किंवा अन्य शासकीय कार्यालयात जावयाचे असल्यास सुमारे 15 कि.मी. अंतर कापून जावे लागत होते. त्यामुळे येथील नागरिकांची स्वतंत्र महासुली गावाची मागणी होत होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी वानोशी या नवीन महासुली गावाला मंजूरी दिली आहे. या नवनिर्मित गावात २९६ कुटुंबे आहेत. पुढील कार्यवाहिसाठी कोकण आयुक्त यांना ही माहिती सादर करण्यात आली असून आयुक्त पातळीवर स्वतंत्र ग्राम पंचायत निर्मितीची घोषणा झाल्यावर येथे निवडणूक लागणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments