गणेश विसर्जनावेळी घडली होती दुर्घटना ; दुसरा अद्यापही बेपत्ता…
आचरा, ता. १३ : गणपती विसर्जनाच्या वेळी समुद्रात बुडून बेपत्ता झालेल्या दोघांपैकी प्रशांत तावडे याचा मृतदेह आज सायंकाळी स्थानिकांना आचरा हिर्लेवाडी समुद्रकिनारी दिसून आला तर संजय परब यांचा शोध अद्यापही सुरू आहे.
अकरा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यास गेलेले प्रशांत तावडे, संजय परब हे खोल समुद्रात बुडून बेपत्ता झाल्याची घटना काल सायंकाळी घडली होती. रात्री उशिरा तसेच आजच्या दिवशीही स्थानिक ग्रामस्थांकडून या दोघांचा किनारपट्टी भागात शोध सुरू होता. यात काही वेळापूर्वीच आचरा हिर्लेवाडी येथील समुद्रकिनारी प्रशांत तावडे याचा मृतदेह पोलिस पाटील जगन्नाथ जोशी, पत्रकार अर्जुन बापर्डेकर, गुरू कांबळी यांना दिसून आला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे. दुसऱ्या बेपत्ता असलेल्या संजय परब याचा शोध अद्यापही सुरू आहे.