पूरग्रस्तांना पंचवीस हजाराची सरसकट भरपाई द्या…

150
2
Google search engine
Google search engine

जयेंद्र परुळेकर; ग्रामीण व शहरी असा भेदभाव नको,मदतनिधी वाटप…

सावंतवाडी ता.१३: पूरग्रस्तांची झालेली नुकसानी लक्षात घेतात त्यांना सरसकट किमान पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई देणे गरजेचे होते.मात्र ग्रामीण भागासाठी दहा हजार व शहरी भागासाठी पंधरा हजार रक्कम ठरवून प्रशासनाकडून त्यांची कुचेष्टा करण्यात आली अशी टीका डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे आयोजित कार्यक्रमात केली.श्री.परुळेकर यांनी मुंबई येथील सामंत ट्रस्टच्यावतीने सावंतवाडी तालुक्यातील काही आर्थिक दृष्ट्या गरजूंना प्रत्येकी दहा हजार रुपयाची मदत केली या मदतीचे धनादेश त्यांनी आज वाटप केले.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, मनसेचे जिल्हाध्यक्ष धीरज परब, आनंद परूळेकर, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर, निर्शाद शेख,आदी पदाधिकारी उपस्थित होते.
ते म्हणाले शासनाने पूरग्रस्तांना नुकसानभरपाई देतांना ग्रामीण व शहरी भाग अशी तुलना केली आहे.त्यामुळे ग्रामीण भागावर अन्याय झाला,असून शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रुपये पंचवीस हजाराची नुकसान भरपाई मिळावी तसेच काही ठिकाणी नुकसान होऊनही नुकसानीचा पंचनामा करण्यात आला नाही,तो तात्काळ करण्यात यावा अशी मागणी उपस्थित केली.
सामान रस्त्यावर तिने पूरग्रस्तांना आर्थिक मदत करण्यात येणार आहे.मात्र शासनाने आपली जबाबदारी ओळखून पंचनाम्यात नुसार आवश्यक ती नुकसान भरपाई त्यांना तात्काळ द्यावी.यावेळी माजी आमदार पुष्पसेन सावंत यांनीही शासनाच्या धोरणावर नाराजी व्यक्त केली डॉक्टर परुळेकर यांनी सावंत रस्त्या वतीने गरजूंना उपलब्ध करून दिलेल्या आर्थिक मदतीचे कौतुक केले.
यावेळी लीलावती जाधव सातार्डा चंद्रलीला रेडकर रेडी अरविंद जाधव इन्सुली शांताराम खाजणेकर मातोंड यशोदा सातार्डेकर सातार्डा गोपाळ दड्डीकर आरोंदा लक्ष्मी कासेकर कारिवडे प्रभावती तानावडे आरोंदा शीला भिसे कुडाळ आधी गरजूंना धनादेश वाटप करण्यात आले.