काँग्रेसचे उपतालुकाध्यक्ष आबा सावंत शिवसेनेच्या वाटेवर…

2

सावंतवाडी/भक्ती पावसकर ता.१३: माजगावचे माजी सरपंच तथा काँग्रेसचे विद्यमान उपतालुकाध्यक्ष आबा सावंत शिवसेनेच्या वाटेवर आहेत.उद्या शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे.त्यांच्याकडे तालुक्याची मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचे वृत्त आहे.
श्री.सावंत सद्यस्थितीत काँग्रेसमध्ये आहेत.मात्र ते राणेसमर्थक म्हणून सुद्धा परिचित आहे.मध्यंतरीच्या काळात नारायण राणे काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर त्यांनी शांत राहणे पसंत केले होते.परंतु गेले काही दिवस ते काँग्रेसमध्ये अलिप्त होते.मात्र आता ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे.
उद्या हा प्रवेश होणार आहे.याबाबतची माहिती शिवसेनेच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्या कडून देण्यात आली.श्री.सावंत युवक काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात आले होते.त्यांनी आपल्या कार्यात माजलगावात बऱ्यापैकी पक्ष संघटना तयार केली.त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला होता.त्यामुळे सरपंच म्हणून निवडून येण्याची संधी मिळाली होती.या काळात त्यांनी गावात अनेक विकास कामे केली होती.

10

4