खासदार उदयनराजे उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार

2

ट्वीटरच्या माध्यमातून माहिती: अनेक दिवस सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम

मुंबई ता.१३: साताऱ्याचे खासदार तथा छत्रपती उदयनराजे यांचा भाजपा पक्ष प्रवेश अखेर ठरला आहे.त्यांनी याबाबतची माहिती खुद्द ट्विटरच्या माध्यमातून ट्विट करून दिली आहे.यात त्यांनी आपण करून १४ सप्टेंबरला दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करणार,असे म्हटले आहे.दरम्यान आजपर्यंत आपण सर्वांनी दिलेल्या प्रेमाचा आणि आशीर्वादाच्या जोरावर सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळत राहील अशी अपेक्षा आहे.
आपली आणि आपल्या आशीर्वाद माझ्या पाठीशी राहतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.दरम्यान लोकसभा निवडणुकी पासून राजे भाजप मध्ये प्रवेश करतील,अशी चर्चा होती.काल त्यांनी राशीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आपण पवार यांचे आशीर्वाद घेतले आहेत,असे सांगितले होते.त्यानंतर आता खुद्द त्याने ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.

4

4