बलात्कार प्रकरणी सावंतवाडीतील युवकाची निर्दोष मुक्तता

2

सिंधुदुर्गनगरी ता.१३
नात्याने मेहुनी असलेल्या एका अल्पवयीन मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेत वारंवार बलात्कार केल्याच्या आरोपातून चंदन आनंद आडेलकर ( वय 27 ) याची सबळ पुराव्याअभावी जिल्हा विशेष न्यायाधीश प्रकाश कदम यांनी निर्दोष मुक्तता केली आहे. संशयित आडेलकर यांच्यावतीने वकील अश्पाक शेख यांनी काम पाहिले.
या प्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात आडेलकर यांच्या विरोधात 376 (एन), 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. जानेवारी 2017 ते 10 एप्रिल 2017 या कालावधीत फिर्यादिच्या रहात्या घरात तसेच पोलिस ग्राउंड येथील सभागृहात वारंवार बलात्कार करीत याबाबत कोणाला सांगितल्यास फिर्यादी व तिची बहिण हिला ठार मारल्याची धमकी दिल्याचा आरोप संशयित चंदन आडेलकर यांच्यावर होता. याप्रकरणी न्यायालयाने एकूण सात साक्षीदार तपासले. यावेळी आरोपी विरोधात कोणताही सबळ पुरावा मिळाला नाही. तसेच मुलीच्या अल्पवयीन असण्याचा पुरावाही मिळाला नाही. त्यामुळे आरोपीच्या वकिलाचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आडेलकर यांची निर्दोष मुक्तता केली.

28

4