वेंगुर्ल्यात उद्या शिवसेनेचा विजय संकल्प मेळावा

2

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंची उपस्थिती

वेंगुर्ले : ता.१३:
शिवसेना नेते व युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे विजय संकल्प मेळावा व जनआशीर्वाद यात्रेनिमित्त उद्या शनिवारी १४ रोजी सकाळी १० वाजता वेंगुर्ल्यात येत आहेत. यानिमित्त साई दरबार हॉलमध्ये शिवसेनेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात अन्य पक्षातील पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे विजय संकल्प मेळावा व जनआशीर्वाद यात्रेनिमित्त वेंगुर्ल्यात येत आहेत. त्यांच्या स्वागतसह शिवसैनिकांच्या मेळाव्याचे नियोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहनही केले आहे. दरम्यान या मेळाव्याद्वारे शिवसेना शक्तिप्रदर्शन करणार असून शहरात ठीकठिकाणी ठाकरे यांच्या स्वागताचे बॅंनर झळकू लागले आहेत.

19

4