समांतर शिक्षक समुपदेशनाला संघटनांचा तीव्र विरोध…

2

विरोधातच १० शिक्षकांचे समुपदेशन ; शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडत प्रक्रियेवर बहिष्कार…

सिंधुदुर्गनगरी, ता. १३ : जिल्हांतर्गत बदलीतील विस्थापित आणि रॅंडम राउंड बदलीतील शिक्षकांचे चुकीच्या पध्दतीने जिप प्रशासन समुपदेशन करीत असल्याचा आरोप करत या पद्धतिला शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला आहे. प्रशानाच्या या कार्यपध्दतीविरोधात सर्व शिक्षक संघटनांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडले. तसेच शिक्षकांनी समुपदेशन प्रक्रियेवर बहिष्कार टाकला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया मे मध्ये राबविण्यात आली होती. मात्र त्यावेळी समुपदेशन पध्दतित अनेक शिक्षक विस्तापित झाले होते. विस्तापित शिक्षकांना समुपदेशन पध्दतीने पुन्हा पदस्थापना देण्यात यावी अशी मागणी शिक्षक संघटनांनी लावून धरली होती. त्यानुसार जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतील विस्तापित आणि रॅंडम राउंड टप्पा क्र. ५ व ६ मधील समुपदेशन पध्दतीने पदस्थापना देण्यात यावी असा ४ सप्टेंबर २०१९ रोजी शासन निर्णय झाला. या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यात ११ सप्टेंबर रोजी शिक्षकांना पदस्थापना देण्याची कार्यवाही सुरु करन्याय आली होती. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी आज जिप मुख्य कार्यकारी अधिकारी के. मंजुलक्ष्मी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांची भेट घेत विस्थापित व रॅंडम राउंड टप्पा ५ व ६ मधील समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्याची मागणी केली. मात्र जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेत विस्थापित शिक्षकांना विस्थापित व रॅंडम राउंड टप्पा ५ व ६ मधील समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्याच्या शासन आदेश हरताळ फासत समुपदेशन करण्यास जिप मुख्य कार्यकारी अधिकारी आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी नकार दिला होता. त्यामुळे सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी ११ सप्टेंबर रोजी जिप समोर धरणे आंदोलन छेडले होते. या आंदोलनाच्या अंनुषंगाने आज शिक्षकांचे समुपदेशन आयोजित करण्यात आले होते. मात्र ही समुपदेश प्रक्रियाही प्रशासन चुकीच्या पध्दतीने राबवित असल्याचा आरोप करत या पद्धतिला शिक्षक संघटनांनी आक्षेप घेतला.

शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या
शिक्षकांचे समुपदेशन प्रक्रिया जिप प्रशासन चुकीच्या पध्दतीने राबवित असल्याने शिक्षक संघटनांनी या प्रक्रियेला आक्षेप घेत सर्व शिक्षकांनी चक्क प्राथमिक शिक्षणाधिकारी यांच्या दालनासमोर काही काळ ठिय्या आंदोलन केले.

प्रक्रियेवर शिक्षकांचा बहिष्कार
आजची समुपदेशन प्रक्रिया चुकीच्या पध्दतीने होत असल्याने या प्रक्रियेत आपल्यावर अन्याय होणार असल्याने आपल्या समुपदेशनाचा हक्क अबाधित ठेवून या प्रक्रियेत शिक्षकांनी आक्षेप नोंदवून प्रक्रियेवर बहिष्कार टाकला तसे पत्रही शिक्षकांनी सादर केले.
१० जणांचे समुपदेशन झाले
दरम्यान याबाबत प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मनमानीचा आरोप फेटाळून लावला. तसेच २७ फ्रेबुवारी २०१९ च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे आदेश शासनाने दिल्याने समानीकरण धोरणानुसार समुपदेशन करने आवश्यक असून त्यानुसार हे समुपदेशन आयोजित करण्यात आले होते. दरम्यान आजच्या समुपदेशनात ४ आंतरजिल्हा बदली आणि ६ रॅंडम राउंड मधील शिक्षकांनी असे १० शिक्षकांनी अर्ज केले होते त्यांचे आज समुपदेशन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

2

4