वेंगुर्ल्याला फिशिंग पोर्टसाठी सुमारे ३५ कोटी रुपयांचा निधी दिला

323
2
Google search engine
Google search engine
Google search engine

पालकमंत्री दीपक केसरकर : सागर बंगला ते लाईट हाऊस पर्यंत जाणाऱ्या पायऱ्यांच्या बांधकामाचे भूमिपूजन

वेंगुर्ले : ता. १३:
युती शासन आल्यानंतर वेंगुर्ले शहरात नगरपरिषदेची विकासाकडे घोडदौड सुरू असल्यामुळे या शहराच्या विकासासाठी भरगोस निधी देण्यात आला आहे. वेंगुर्ल्याला फिशिंग पोर्टसाठी सुमारे ३५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून ज्यामुळे जिल्ह्यातील सर्वप्रथम ब्रेक वॉटर वॉल होऊन जो गाळ साचतो तो बंद होईल. तसेच गाडीअड्डा येथील मारुती मंदिराच्या ठिकाणी स्टेप गार्डन साठी ५० लाख, दलित वस्तीतील स्मशानभूमीसाठी ७५ लाख मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
वेंगुर्ले नगरपरिषदेच्या सागर बंगला ते लाईट हाऊस पर्यंत पायऱ्यांचे बांधकाम करणे तसेच वेंगुर्ला वेशी व मानसी पूल याठिकाणी स्वागत कमानी उभारणे या कामांची भूमिपूजन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते.
यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, पं. स. सभापती सुनील मोरजकर, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी वैभव साबळे, नगरसेवक प्रशांत आपटे, शीतल आंगचेकर, पूनम जाधव, कृपा गिरप-मोंडकर, दक्षता कमिटीचे अध्यक्ष सचिन वालावलकर, शिवसेना शहर प्रमुख विवेक आरोलकर, सुकन्या नरसुले, मंजुषा आरोलकर, तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्यासाहित इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना पालकमंत्री केसरकर म्हणाले की, पाण्यासाठी मोठा निधी निशाण तलावाला देण्यात आला असून याचे काम सुरू होण्यापूर्वी तीलारीचे पाणी शहरात आणण्यासाठी नियोजन सुरू आहे. झुलत्या पुलासाठी ४ लाखांचा निधी देण्यात आला असून ज्या तांत्रिक अडचणी मुळे हे काम बंद होते त्या आता दूर झाल्या आहेत. पावसाळा संपल्यानंतर याचे काम सुरू करण्यात येईल असे यावेळी पालकमंत्री यांनी सांगितले आहे.

\