स्मार्ट ग्राम” पुरस्कारासाठी कुडासे व विर्डी गावांची पहाणी…

166
2
Google search engine
Google search engine

दोडामार्ग ता.१३: जिल्हा स्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कारासाठी तालुक्यातील कुडासे खुर्द (पाल पुनर्वसन ) व विर्डी या दोन गावांची पहाणी निवड समितीकडून शुक्रवारी करण्यात आली .
दोडामार्ग तालुक्यातील कुडासे खुर्द ( पाल पुनर्वसन ) व विर्डी या दोन गावांना तालुकास्मार्ट ग्राम हा पुरस्कार विभागून देण्यात आला होता . त्यामुळे हे गाव जिल्हास्मार्ट पुरस्कारासाठी पात्र ठरले होते . उपमुख्य कार्यकारी अधिकारी दिपाली पाटील व त्यांच्या निवड समितीतील सदस्यांनी सुरुवातीला विर्डी गावात जात पहाणी केली . त्याठिकाणी सरपंच प्रिया गवस व ग्रामस्त यांनी स्वागत केले . त्यानंतर एक वाजण्याच्या सुमारास ही निवड समिती कुडासे खुर्द या गावात गेली . याठिकाणी सरपंच संगीता देसाई , सदस्य संदेश देसाई , सान्वी दळवी , मयुरी पालव आदीसह ग्रामस्थांनी निवड समितीचे स्वागत केले . निवड समितीने गावातील सार्वजनिक स्वच्छता , कचऱ्याचे वर्गीकरण , शैक्षणिक स्थिती , कार्यालयीन काम यासह अनेक बाबींची इत्यभूत माहिती जाणून घेत आपल्या गुप्त नोंदी घेतल्या.