हॉटेल मॅनेजमेंट शिक्षण सोन्याचे दिवस दाखवणारे…

66
2
Google search engine
Google search engine
Google search engine

प्रवीण प्रभूकेळुसकर; मालवणातील कुकिंग वर्कशॉपला उत्स्फूर्त प्रतिसाद…

मालवण,ता.१७: हॉटेल मॅनेजमेंट शिक्षण युवा पिढीला सोन्याचे दिवस दाखवू शकते त्यासाठी शास्त्रशुध्द शिक्षण घेणे आवश्यक आहे. असे आवाहन लोकमान्य शिक्षण विभागाचे वरिष्ठ एक्झिक्यूटिव्ह प्रवीण प्रभूकेळुसकर यांनी केले. दरम्यान पर्यटन वाढ ही दुधारी तलवार आहे, ती योग्य रित्या हाताळता आली नाही तर युवा पिढीचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे कठोर परिश्रम करून या संधीचे सोने करा, असे त्यांनी सांगितले.

नैसर्गिक पदार्थांचा वापर करून चविष्ट व खमंग पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी जय हिंद कॉलेज ऑफ सायन्स ( हॉटेल मॅनेजमेंट‌ ) साळगाव आणि बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच कुकिंग वर्कशॉचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री. प्रभूकेळुसकर बोलत होते. वर्कशॉपमध्ये ३५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या वर्कशॉपमध्ये बटर चिकन, पालक पनीर, विविध प्रकारचे कबाब, पंजाबी डिशेस, विविध प्रकारच्या ग्रेव्ही, सणासुदीला बनवले जाणारे गोड पदार्थ तसेच विविध प्रकारचे मॉक्टेल्स यांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले व उपस्थित मुलांकडून प्रत्यक्ष पदार्थ तयार करून घेण्यात आले.

अशा प्रकारचे समाज उपयोगी उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम आपण एकत्रित राबवू, असे प्रतिपादन बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर यांनी केले. या कार्यक्रमाला बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे कार्यवाहक लक्ष्मीकांत खोबरेकर, जयहिंद कॉलेज ऑफ सायन्सचे प्राचार्य अमेय महाजन आदी मान्यवर उपस्थित होते.

\