नागरिकांची भंबेरी; योग्य तो बंदोबस्त करा, वनविभागाकडे मागणी…
सावंतवाडी,ता.१७: येथील माठेवाडा परिसरात ८ ते १० गव्यांच्या कळपाने भर वस्तीत हजेरी लावली. घराशेजारी असलेल्या गव्यांना पाहून अनेकांची भंबेरी उडाली. गेले काही दिवस हे गवे भर वस्तीच्या ठिकाणी येत आहेत. त्यामुळे कोणताही अपघात अथवा अनुचितत प्रकार घडू नये यासाठी वनविभागाकडून योग्य ती काळजी घेण्यात यावी व त्या गव्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
आज तेथील रहिवाशी कुणाल सावंत यांच्या घरा शेजारी हा गव्यांचा कळप सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दाखल झाला. त्या ठिकाणी लहान मुले खेळत असताना अचानक तो दृष्टीस पडला. त्यामुळे या प्रकाराबाबत स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.