देवगड,ता.१७: तालुक्यात शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने मोंड गावातील वाहून गेलेल्या “त्या” रस्त्याची आमदार नितेश राणे यांनी पाहणी केली. तसेच संबंधित यंत्रणांना तातडीने रस्त्याची डागडुजी करण्याच्या सूचना दिल्या.
देवगड तालुक्यातील मोंड गावाला शनिवारी झालेला मुसळधार पावसाचा फटका सहन करावा लागला. यात गावातील मोंड कॉलेज ते गावठाणकडे जाणारा सुमारे २०० मीटरचा रस्ता वाहून गेला. रस्त्यानजीक जलजीवन योजनेच्या पाईपलाईनसाठी गटारी खोदण्यात आलेले हे काम अर्धवट स्थितीत असल्यामुळे गटारात पावसाचे पाणी साचून घाट रस्ता उखडून गेला, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच या रस्त्याच्या नजीक चार ते पाच फुटाचे चर पडले असून नजिकच्या वाडीत या चराची माती पाण्याच्या बदललेल्या प्रवासामुळे तेथील घरांच्या मागील बाजूने घरात घुसली. यात सुमारे पाच ते सहा घरे बाधित झाली होती. दरम्यान हा रस्ता शेतकऱ्यांचा कायमस्वरूपी ये-जा करण्याचा मार्ग असून घाटीचा रस्ता वाहून गेल्यामुळे घाटीवर चालने मुश्किल झाले आहे. याची दखल घेऊन श्री. राणे यांनी रस्त्याची पाहणी केली.
यावेळी उपसरपंच अभय बापट, जिल्हा उपाध्यक्ष संदीप साटम, बाळ खडपे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
देवगड-मोंड रस्त्याची आमदार नितेश राणेंकडून पाहणी…
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES