Monday, July 7, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याशिवसंस्कारच्या माध्यमातून आंतरराज्य “दुर्ग फोटोग्राफी” स्पर्धेचे आयोजन...

शिवसंस्कारच्या माध्यमातून आंतरराज्य “दुर्ग फोटोग्राफी” स्पर्धेचे आयोजन…

सावंतवाडी,ता.१७: रायगडावर २० जूनला होणार्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवसंस्कारांचे जतन आणि मंथन करणाऱ्या शिवसंस्कारच्या माध्यमातून महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व गुजरात या चारही राज्यांमध्ये भव्य “दुर्ग फोटोग्राफी” स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी कोणतीही वयोमर्यादा नसून स्पर्धकाने केवळ स्वतः काढलेलेच फोटो पाठवायचे आहेत. स्पर्धेसाठी एक स्पर्धक कमीत कमी एक व जास्तीत जास्त तीन फोटो पाठवू शकतो. आपले नाव, संपूर्ण पत्ता असलेले फोल्डर बनवून त्यामध्ये आपले फोटो पाठवायचे आहेत. कोणत्याही किल्ल्याचा फोटो स्पर्धक पाठवू शकतात. स्पर्धा ऑनलाइन असल्याने फोटो शिवसंस्कारच्या अधिकृत नंबरवर ९६०७८२७२९६ ५ जुलै पर्यंत पाठवायचे आहेत. स्पर्धेची फी १०० रुपये असून शिवसंस्कारच्या नंबरवर पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त घेतल्या जाणाऱ्या या स्पर्धेसाठी भरभरून प्रतिसाद द्यावा असे आवाहन शिवसंस्कारच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे. विजेत्या छायाचित्रकारांना वार्षिक भव्य सन्मान सोहळ्यात महत्वाच्या सन्माननीय अतिथींच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments