सावंतवाडी/अमोल टेंबकर ता.१४: पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याशी फारकत घेऊन ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगराध्यक्ष बबन साळगावकरांनी केसरकर यांच्या विरोधात बिगुल फुंकले आहे.आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण राष्ट्रवादी मधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.या सर्व पार्श्वभूमीवर विद्यमान नगराध्यक्ष असताना साळगावकरांनी घेतलेली भूमिका ही नेमकी महत्वकांक्षा की राजकीय आत्महत्या असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांतून विचारला जात आहे.
श्री.केसरकर यांचे अत्यंत जवळचे व विश्वासू शिलेदार म्हणून साळगावकरांची ओळख होती.मात्र निवडणुकीच्या तोंडावर काही दीवस आधी मैत्री तुटली.त्यामुळे साळगावकर यांनी घेतलेली भूमिका योग्य की अयोग्य हे येणारा काळच ठरवणार असून,चढाओढीच्या या राजकारणात साळगांवकरांना त्यांचा फायदा होणार की तोटा हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पालकमंत्री केसरकर यांच्या सोबत राजकारणात नगरसेवक ते नगराध्यक्ष आणि एक स्वच्छ राजकारणी म्हणून प्रतिमा निर्माण केलेल्या बबन साळगावकर आज जिल्ह्याला एक धडाडीचा कार्यकर्ता म्हणून ओळख आहे.श्री.साळगावकर यापूर्वी केसरकर यांच्या विरोधात कधीही उघडपणे बोलले नाही.सावंतवाडीचा चेहरामोहरा बदलण्यास केसरकर युगपुरुष ठरले,असे भर कार्यक्रमात सांगणाऱ्या साळगावकरांनी आता मात्र त्यांच्या विरोधात दंड थोपटले आहेत.येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतून तिकीट मिळाल्यास आपण केसरकर यांच्या विरोधात सावंतवाडी विधानसभा लढवू आणि जनाधार असल्यामुळे नक्कीच निवडून येऊन असा त्यांना विश्वास आहे.या विश्वासाच्या जोरावर त्यांनी आपली वाटचाल सुरू ठेवली आहे.
गेल्या काही दिवसात केसरकर व साळगावकर यांच्यात शीतयुद्ध रंगले होते.मागच्या नगरपालिका निवडणुकीत केसरकारांनी थेट नगराध्यक्ष म्हणून साळगावकर यांची निवड केली होती.परंतु आयत्यावेळी आपण शिवसेनेतून निवडणूक लढणार नाही,अशी भूमिका साळगावकरांनी घेतली.अखेर शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून साळगावकर निवडणूकीला सामोरे गेले व निवडून आले.त्यानंतर काही दिवसांनी त्यांच्यातील शीतयुद्धाला सुरुवात झाली.दरम्यानच्या काळात सावंतवाडी निर्माण झालेला दफनभूमीच्या प्रश्न,आत्मक्लेश आंदोलन असो तलावात सुरू करण्यात आले वॉटर स्पोर्टस अशा विषयात केसरकर आणि साळगावकर यांच्यात फाटले.
सावंतवाडी पालिकेला थेट निधी न देता शहरातील विकास कामांचा निधी एमटीडीसी कडे वर्ग करण्यात आल्यामुळे पुन्हा साळगावकर नाराज झाले.त्यामुळे त्यांच्यात कलगीतुरा रंगला.आज मात्र केसरकर आणि साळगावकर यांच्या कमालीचे वितुष्ट आले आहे.काही झाले तरी आपण लढणार असे साळगावकर यांचे म्हणणे तर साळगावकरांनी आपले नशीब आजमवावे असे केसरकर यांनी त्यांना अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.या सर्व परिस्थितीत साळगावकर रिंगणात उभे राहण्याची शक्यता आहे.तशी इच्छा त्यांनी व्यक्त केली असली तरी राष्ट्रवादीची सध्याची जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेता म्हणावी तशी पोषक नाही.राज्यात पडझड सुरू आहे या परिस्थितीत सत्ताधारी पक्षाचे नगराध्यक्षपद सोडून साळगावकर राष्ट्रवादीच्या पाठीकडे जात आहेत.जर ते विधानसभेच्या निवडणूक रिंगणात उतरले तर ते शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आल्यामुळे त्यांना नगराध्यक्ष पद गमवावे लागणार आहे. दुसरीकडे त्यांची प्रतिमा समाजात चांगली असली तरी निवडणुकीत काही गोष्टी दुर्लक्ष करून चालणार नाही मतदार संघाची रचना, मतदार राजाकडू होणारी मागणी या सर्व गोष्टी लक्षात घेता साळगावकर नेमके त्यांना कसे काय तोंड देणार हे प्रश्नचिन्ह आहे.वीस वर्षांपूर्वी शिवसेनेत असताना साळगांवकरांना खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी विधानसभा लढविण्याच्या सूचना केल्या होत्या. टिळा लावून त्यांना काम करण्याचे आदेश दिले होते.परंतु त्यांनी आमदार शिवराम त्यांचे नाव आल्यामुळे ते मागे पडले होते.पुन्हा एकदा आता केसरकर यांच्याविरोधात यांना संधी मिळेल अशी अपेक्षा आहे.केसरकर यांच्या विरोधात निश्चितच राष्ट्रवादीचे पदाधिकारी त्यांना पाठिंबा देतील अशी शक्यता आहे. या सर्व परिस्थितीत साळगावकरांनी घेतलेली भूमिका ही त्यांच्यासाठी पोषक ठरेल की घातक हे येणारा काळच ठरवणार आहे
साळगावकरांची महत्त्वाकांक्षा,की राजकीय आत्महत्या..?
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
Download WordPress Themes Nulled and plugins.
RELATED ARTICLES