युवा सिंधू फाउंडेशन आणि शिरोडा ग्रामपंचायतीचा पुढाकार…
वेंगुर्ले ता.१४: युवा सिंधू फाउंडेश,सिंधुदुर्ग आणि शिरोडा ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या दिनांक १५ सप्टेंबर रोजी सकाळी ८:०० वा. शिरोडा वेळागर समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार आहे. यावेळी जास्तीत-जास्त सामाजिक संस्था तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे,असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते सागर नाणोसकर यांनी केले आहे.
गणेश चतुर्थी १२ ऑगस्टला समाप्त होत असून या कालावधीत समुद्रात गणेश विसर्जन केले जाणार आहे.यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा किनाऱ्यावर साचणार आहे.समुद्र किनारा स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी असल्याने या स्वछता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी सर्व सामाजिक संस्था नागरिकांचे सहकार्य मोठ्या प्रमाणात अपेक्षित आहे.याबाबत अधिक माहितीसाठी सागर नाणोसकर (९४२३३०९१६६), दीपेश परब (७७७४९०५०३६),अजित सावंत(८४४६०६२६४४),ग्रामपंचायत शिरोडा (०२३६६२२७२२८) यांच्याशी संपर्क साधावा.