उच्च माध्यमिक शाळांच्या तुकडया अनुदानास पात्र करताना सिंधुदुर्गावर अन्याय…

2

सिंधुदुर्गनगरी.ता,१४: महाराष्ट्र राज्यातील १६५६ उच्च माध्यमिक शाळा, ५२३ तुकड्या,
अतिरिक्त शाखांवरील ९०९७ शिक्षक / शिक्षकेत्तर पदाना १ एप्रिल २०१९ पासून अनुदानासाठी पात्र घोषित करुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फक्त दोन शाळांचा समावेश करुन महाराष्ट्र शासनाकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अन्याय करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातून उच्च माध्यमिक शाळांच्या अनेक तुकड्याचे प्रस्ताव मंजूरीसाठी असताना हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडीच्या कला व विज्ञान शाखेत तर मोंड, देवगड येथील माणगावकर कनिष्ठ महाविद्यालयाला कला, वाणिज्य व संयुक्त तुकडीला अशा प्रकारे फक्त दोनच उच्च माध्यमिक शाळांचे प्रस्ताव अनुदानास प्राप्त घोषित करण्यात आले आहेत.
गेली अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा १०वी, १२वी चा निकाल महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा आहे. तरी सुद्धा फक्त दोनच उच्च माध्यमिक शाळा अनुदानासाठी घोषित करण्यात आल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. १३ सप्टेंबर २०१९ रोजी निघालेल्या महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या निर्णयानुसार अमरावती विभागातील २८० उच्च माध्यमिक शाळांना, औरंगाबाद विभागातील ३५१ उच्च माध्यमिक शाळांना लातूर विभागातील ११२. मुंबई विभागातील ६८. नागपूर विभागातील २९८, नाशिक विभागातील २०५, पुणे विभागातील २३९ तर कोल्हापूर विभागातील ८५ उच्च माध्यमिक शाळांच्या तुकड्यांना त्यापैकी उच्च शैक्षणिक गुणवत्ता असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फक्त दोनच शाळांना अनुदानास पात्र घोषित करण्यात आल्यामुळे
सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अन्याय झाला आहे.शासन निर्णयात १६५६ उच्च माध्यमिक शाळांचा उल्लेख असला तरी जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये १६३८ शाळा आहेत.

29

4