रेवंडीत नारायण राणे यांच्या खासदार निधीमधून मंजूर विविध विकासकामांचे भूमिपूजन…

256
2
Google search engine
Google search engine
Google search engine

मालवण, ता. १४ : सभापती सोनाली कोदे यांच्या प्रयत्नातून खासदार नारायण राणे यांच्या खासदार निधीतुन मंजूर झालेल्या गावहोळी येथील संरक्षण भिंत बांधणे व भेरेवाडी कोणीवाडी रस्ता काँक्रीटीकरण करणे या विकासकामांचे भूमिपूजन उपसरपंच श्यामसुंदर तळाशिलकर व ज्येष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष श्यामराव कांबळी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सभापती सोनाली कोदे, सरपंच प्रिया कांबळी, ग्रामपंचायत सदस्य सायली कांबळी, जान्हवी कांबळी, युवराज कांबळी, स्वाभिमान गाव अध्यक्ष पांडुरंग कांबळी, युवक अध्यक्ष प्रथमेश करलकर, महिला अध्यक्ष कृतिका कांबळी तसेच जयराम कांबळी, बबन वेंगुर्लेकर, रवींद्र कांबळी, शैलेंद्र कांबळी, विजय कांबळी, प्रसन्ना कांबळी, विलास सामंत, प्रकाश कांबळी, अनिल वराडकर, संजय वेंगुर्लेकर, विनायक कांबळी, विजय कांबळी, विराज तळाशिलकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

\