चांदा ते बांदा योजना जिल्ह्याच्या विकासाला जीवनदायी ठरेल…

2

दीपक केसरकर; जिल्ह्याला ३७० कोटी मंजूर,पैकी १२९ कोटी उपलब्ध…

सावंतवाडी ता.१४: चांदा ते बांदा योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याला ३७० कोटी मंजूर झाले असून त्यापैकी १२९ कोटी रुपयाचा निधी विविध विकास कामासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे.त्यामुळे ही योजना जिल्ह्याच्या या विकासाला जीवनदायी ठरेल असा विश्वास पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केला.
श्री.केसरकर यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली.त्यावेळी त्यांनी आत्तापर्यंत चांदा ते बांदा योजनेअंतर्गत राबवलेल्या योजना व दिलेल्या निधीबाबत माहिती दिली यामध्ये आत्तापर्यंत भाताच्या क्षेत्रात २३ हेक्टरमध्ये विविध शेती यांत्रिकीकरणाच्या प्रात्यक्षिकांवर भर देण्यात आला.त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढून हजार हेक्टर मध्ये भात लागवड वाढली.दुसरीकडे पुरपरिस्थितीत ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले अशा शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी प्रती हेक्‍टरी १२ हजार रुपये अनुदान देण्यात आले, तर यापूर्वी जिल्ह्यात 2 हजार हेक्टर मध्ये घेतले जाणारे रब्बी पिक आता 12000 हेक्टर पर्यंत वाढले.
श्री.केसरकर पुढे म्हणाले चांदा ते बांदा अंतर्गत आंब्यांच्या जुन्या झाडांना पुलिंग करण्यासाठी क लाख 50 हजार रुपये प्रति हेक्‍टरी सबसिडी देण्यात येते आत्तापर्यंत 215 शेतकऱ्यांनी लाभ घेतला तर मच्छीमारांसाठी छोट्या होड्यांना यांत्रिकीकरणासाठी सबसिडी उपलब्ध करुन देण्यात आली आहे इन्सुलेटर व्हॅन साठी 50 टक्के सबसिडी अंतर्गत अकरा व्हन जिल्ह्यात घेण्यात आलेल्या आहेत याचा लाभ इतर मच्छीमारांनी ही घ्यावा यासाठी मच्छिमारांनी पुढे येण्याची गरज आहे.लघुपाटबंधारे अंतर्गत आत्तापर्यंत 86 बंधारे बांधले असून कात्या उद्योगासाठी 12 केंद्रे उभारले जाणार आहे त्यापैकी सहा केंद्रांचे काम पूर्ण झाले तर मधुमक्षिकापालन पेट्यांचे वाटप जिल्ह्यात करण्यात आले असून आंबोली मधुमक्षिका पालन पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.
श्री.केसरकर पुढे म्हणाले सिंधुदुर्गातील मच्छिमारांना गोव्यावर अवलंबून राहावे लागत असल्याने बांदा येथे होलसेल मच्छी मार्केट साठी दोन कोटी 30 लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे तर केरळच्या धर्तीवर तिलारी जंगलात असलेले प्राणी बोटिंग द्वारे पाहता यावे यासाठी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे तर मुंबई येथील मरीन ड्राइव्हच्या धर्तीवर वेंगुरला बंदर सुशोभीकरण करण्यात येणार असून दोन कोटी 86 लाख रुपये नगरपालिकेला मंजूर करण्यात आले आहेत तेथील बंदरांमध्ये स्कुबा डायविंग साठी पंधरा लाख रुपये देण्यात आहे.शेतकऱ्यांना शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी समृद्ध किसान योजना अमलात आणण्यात आली असून सोलर पंप पाईपलाईन शेड व विहीर बांधण्यासाठी दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून या योजनेचा लाभ येथील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले तर नारळाच्या झाडामध्ये किड्यांचा पादुर्भाव होऊन शेतकऱ्यांचे होणारे नुकसान लक्षात घेता सोलार ट्रॅप उपलब्ध करून देण्यात येणार आहे शेतकऱ्यांच्या घरी उपलब्ध होणारे दूध लक्षात घेता प्रोसेसिंगसाठी योजना अमलात देण्यात येणार असून त्यासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सावंतवाडी वेंगुर्ले व व मालवण येथील नाट्यगृह आधुनिक करण्यात येणार असून त्यामध्ये सावंतवाडी नाट्यगृह साठी एक कोटी 68 लाख मालवण नाट्यगृह साठी एक कोटी 16 लाख तर वेंगुरला नगर परिषदेच्या नवीन होणाऱ्या नाट्यगृह साठी दोन टप्प्यात एक कोटी 60 लाख रुपये देण्यात येणार आहे त्याचा 85 लाख रुपये हा पहिला टप्पा पालिकेकडे वर्ग करण्यात आल्याचे केसरकर म्हणाले. नागरी सुविधा अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या असलेल्या बांधा माजगाव कोलगाव तळवडे उभादांडा रेडी शिरोडा ओरस बुद्रुक नेरुळ माणगाव पिंगळी फोंडाघाट कासार्डे आजरा कलमठ या ग्रामपंचायतींना नऊ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून या माध्यमातून गावातील विकास कामात भर पडणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले

14

4