स्वप्नातला महाराष्ट्र घडविण्यासाठी साथ द्या

2

आदित्य ठाकरे; वेंगुर्ले येथे जल्लोषी स्वागतात आगमन…

वेंगुर्ले ता.१४: आमची ही जनआशिर्वाद यात्रा ही राजकीय यात्रा नसून जनतेचा आशिर्वाद घेण्यासाठी यात्रेच्या माध्यमातून तूमच्यापर्यंत आलो आहे.बेरोजगारी मुक्त, दुष्काळ मुक्त, सुरक्षित व सुदृढ असा स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचा असल्याने तुमचे प्रेम व आशिर्वाद घेण्यासाठी आलो आहे. माझ्या बरोबर तुम्ही असाल तर असा महाराष्ट्र घडविण्यापासून आपल्याला कोणीही थांबऊ शकत नाही असा विश्वास शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी वेंगुर्ले येथे व्यक्त केला.
वेंगुर्ले सुंदर भाटले शिवसेना शाखेच्या समोर आदित्य ठाकरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित केले. सभास्थळी सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी, कार्यकार्ते यांची मोठी गर्दी होती.या वेळी त्यांच्या सोबत खासदार विनायक राऊत, पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, महिला आघाडी प्रमुख जानव्ही सावंत, विक्रांत सावंत, वेंगुर्ले तालुकाप्रमुख यशवंत परब, सभापती सुनील मोरजकर, उपनगराध्य अस्मिता राऊळ आदींसह मान्यवर उपस्थित होते.
जनआशिर्वाद यात्रे साठी निघालेल्या बस मधून स्वागत सभेच्या ठिकाणी आदित्य ठाकरे यांचे आगमन ११.४५ वाजता होताच शिवसयनिकांनी एकच जल्लोष केला.प्रारंभी खासदार विनायक राऊत यांनी प्रास्ताविक केल्यावर आदित्य ठाकरे यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

5

4