आंबोलीचा मुख्य धबधबा अखेर प्रवाहीत…

810
2
Google search engine
Google search engine

आंबोली,ता.२१: वर्षा पर्यटनात महत्त्वाचा दुवा ठरणारा आंबोली येथील मुख्य धबधबा अखेर ओसंडून वाहू लागला आहे. गेले काही दिवस पावसाला जोर नसल्यामुळे धबधबा पुर्ण क्षमतेने प्रवाहीत झाला नव्हता. त्यामुळे त्या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची हिरमोड होत होती. मात्र काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे धबधबा पुर्ण क्षमतेने वाहू लागला आहे. त्यामुळे पर्यटकांना आता त्याचा फायदा होणार आहे.